भिवंडीत प्लंबरला मारहाण; तिघांवर गुन्हा

भिवंडी: शहरातील एस.टी कॉलनी परिसरात भांडण सोडवण्यास गेलेल्या एका प्लंबरला तीन अनोळखी इसमांनी संगनमताने दमदाटी करून बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.या मारहाण प्रकरणी तिघा

 भिवंडी: शहरातील एस.टी कॉलनी परिसरात भांडण सोडवण्यास गेलेल्या एका  प्लंबरला तीन अनोळखी इसमांनी संगनमताने दमदाटी करून बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.या मारहाण प्रकरणी तिघा अनोळखी इसमांविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शाहबाज शफीउद्दीन अन्सारी असे मारहाणीत जखमी झालेल्या प्लंबरचे नाव असून तो आझाद नगर येथील मित्राला कामाचे पैसे देवून घरी जात असताना एस.टी. स्टॅण्ड परिसरातील मोकळ्या जागेत त्यास भांडणाचा आवाज येत असल्याने तो भांडण सोडवण्यासाठी गेला असता तीन अनोळखी इसमांपैकी एका इसमाने ‘तू कोन होता है हमारे बीच मे आनेवाला’ असे बोलून त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने शाहबाजच्या डोक्यावर मारून दुखापत केली आहे तर अन्य दोघांनी शाहबाज यास दमदाटी केली. या मारहाणीच्या घटनेचा पुढील तपास निजामपूरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार डी.जी.कुरणे करीत आहेत.