भिवंडीत चिनी वस्तूंची होळी – दुचाकी, सायकल जाळून केला निषेध

भिवंडी:कोरोना विषाणू ला जन्माला घालणारा चीन देशाची विश्वात नाचक्की होत असतानाच भारतीय सीमेमध्ये घुसुन चिनी सैनिकांनी निशस्त्र २० भारतीय जवानांची हत्या केली या विरोधात संपूर्ण देशभरात चीन

 भिवंडी: कोरोना विषाणू ला जन्माला घालणारा चीन देशाची विश्वात नाचक्की होत असतानाच भारतीय सीमेमध्ये घुसुन चिनी सैनिकांनी निशस्त्र २० भारतीय जवानांची हत्या केली या विरोधात संपूर्ण देशभरात चीन देश विरोधात संताप होत असतानाच ठिकठिकाणी चिनी उत्पादनावर बहिष्कार घालण्यासह होळी केली जात आहे . भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील महावीर चौक या ठिकाणी भाजपा नगरसेवक निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नितेश एनकर ,मयुर चौधरी ,सुरेश गडा यां सह कार्यकर्त्यांनी एकत्रित होत चिनी वस्तूंची होळी केली .या होळीत चिनी बनावटीची इलेक्ट्रिक दुचाकी, सायकलसह मोबाईल, कॉम्प्युटर साहित्य जाळण्यात येऊन चिनी राष्ट्राध्यक्षाचा पुतळा जाळला . त्यानंतर सर्वानी भविष्यात चिनी उत्पादनाच्या वस्तू वापरणार नसल्याची शपथ घेतली .