corona death

भिवंडी: भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोना विषाणू पॉझिटिव्ह असलेले ३३१ रुग्ण आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.मात्र गेल्या महिनाभरात १,८१० तापाचे रुग्ण आढळल्याने

 भिवंडी: भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोना विषाणू पॉझिटिव्ह असलेले ३३१ रुग्ण आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.मात्र गेल्या महिनाभरात १,८१० तापाचे रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही दिवसांपासून भिवंडी तालुक्यात टॉयफइड, मलेरिया आणि कोरोना विषाणूने उच्छाद मांडला आहे.शासकीय रुग्णालये हे कोरोना सेंटर करण्यात आले आहेत.तर खाजगी रूग्णालये ही बंद असल्याने या तापाच्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे लागत आहेत .यातील कित्येक रुग्ण तापाने फणफणले आहेत.असे असताना भिवंडी पंचायत समितीचे मुख्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बरल हे मनमर्जीने कामावर येत असल्याने तालुक्यातील आठ आरोग्य केंद्रावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नसल्यामुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्यच धोक्यात आले आहे.