भिवंडीत भंगार गोदामांना भीषण आग

भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभर लॉकडाऊन करण्यात आले असले तरी दुसरीकडे भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नाही. तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील कैलास नगर येथे ग्रामपंचायत

 भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभर लॉकडाऊन करण्यात आले असले तरी दुसरीकडे भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नाही. तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील कैलास नगर येथे ग्रामपंचायत प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या १२ भंगार गोदामांना काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या भंगार गोदामांमध्ये लाकडी व प्लास्टिक वस्तू तसेच प्लाय मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. या आगीत गोदामांमध्ये उभे असलेले दोन टेम्पो देखील जळून खाक झाले आहेत. हि आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही. मात्र मध्यरात्री लागलेल्या या भीषण आगीच्या ज्वाला नागरिकांनी पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती दिल्यानंतर देखील एक ते दिड तास उशिराने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या भंगार गोदामांचे मालक व कामगार गावी गेल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमनदलास मोठे परिश्रम करावे लागले असून गुरुवारी दुपारनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहेत.