भिवंडीत चप्पलच्या दुकानाला भीषण आग

भिवंडी: भिवंडी शहरातील धामणकरनाका येथील चप्पलच्या दुकानात भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे चपल , बूट जळून खाक झाले आहेत. अग्निशमक दलाच्या एका गाडीवरील जवानांनी दोन तासांत आग आटोक्यात

 भिवंडी: भिवंडी  शहरातील धामणकर नाका येथील चप्पलच्या दुकानात भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे चपल , बूट जळून खाक झाले आहेत. अग्निशमक दलाच्या एका गाडीवरील जवानांनी दोन तासांत आग आटोक्यात आणल्याने बाजूची दुकाने वाचली आहेत. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही. 

पालिकेच्या प्रभाग समितीमधील धामणकर नाका परिसरातील विध्याश्रम लागत असलेल्या आठ ते दहा दुकान परिसरातील एका चप्पल दुकानास आज सकाळी ११  वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सदरची घटना पालिकेच्या अग्निशान दलास मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर दोन तासांत नियंत्रण मिळविले. मात्र या आगीत दुकानाती लाखो रुपयांची चप्पल, बूट जाळून खाक झाल्याचे समजते.