निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सांगे गावातील स्मशानभूमी कोसळली – अंत्यविधीसाठी होणार गैरसोय

भिवंडी: निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्यात निष्कृट दर्जाचे साहित्य वापरून उभारलेली स्मशानभूमी बुधवारी रात्रीच्या सुमारास कोसळल्याची घटना तालुक्यातील सांगे गावात घडली आहे. दरम्यान स्मशानभूमी

 भिवंडी: निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्यात निष्कृट दर्जाचे साहित्य वापरून उभारलेली स्मशानभूमी बुधवारी रात्रीच्या सुमारास कोसळल्याची घटना तालुक्यातील सांगे गावात घडली आहे. दरम्यान स्मशानभूमी कोसळल्याने येत्या काही दिवसात जर एखाद्या ग्रामस्थाचे निधन झाल्यास त्यांच्यावर अंतविधी करायचा कुठे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

भिवंडी तालुक्यातील प्रत्येक गाव – पाड्यात  स्मशानभूमी असावी, असे शासनाचे धोरण आहे. यानुसार भिवंडी तालुक्यात शासनाने स्मशानभूमी बांधकाम व दुरुस्तीसाठी परवानग्या व निधी देण्यात आल्या आहेत. याच पार्श्ववभूमीवर सांगे गावातही सुमारे ५ लाख निधी खर्च करून याच वर्षी मार्च महिन्यात स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र स्मशानभूमी उभारणाऱ्या ठेकेदाराने  निष्कृट दर्जाचे साहित्य वापरून उभारलेली स्मशानभूमी निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून कोसळल्याने ठेकेदाराचे पितळ उघडले पडले आहे. तर दुसरीकडेे टेंभीवली येथे चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या टेंभीवली उपकेंद्राचे पत्रा शेडचे संपूर्ण छत वाऱ्याने उडाल्याने आरोग्य उपकेंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उपकेंद्राचे छत उडाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान हे पत्रा शेडचे छत दोन महिन्यांपूर्वीच बनविले असल्याने ठेकेदाराने केलेले निकृष्ट काम चव्हाट्यावर आले असून या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. 

दरम्यान, याबाबत भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्याकडे विचारणा केली असता सांगे गावातील स्मशानभूमी कोसळल्याची माहिती आमच्यापर्यत आली नसून आम्ही कोरोनाबाधित रुग्णांच्या कामात व्यस्त आहोत. आता लगेच बांधकाम विभागातील संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.