जागरुक भिवंडीकरांनी गुटखा पान मसाला नेणाऱ्याविरोधात केली तक्रार ; अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल

भिवंडी: महाराष्ट्र राज्यात जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य शासनाने २० जुलै २०१९ पासून १ वर्षाच्या कालावधीसाठी संपूर्ण राज्यात तंबाखूजन्य सुगंधीत सर्व प्रकारच्या गुटखा, पान मसाला पदार्थांवर

 भिवंडी: महाराष्ट्र राज्यात जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य शासनाने २० जुलै २०१९ पासून १ वर्षाच्या कालावधीसाठी संपूर्ण राज्यात तंबाखूजन्य सुगंधीत सर्व प्रकारच्या गुटखा, पान मसाला पदार्थांवर बंदी घातलेली आहे.मात्र असे असतानासुद्धा शहरात सर्रासपणे गुटखा पान मसाल्याची विक्री केली जात असल्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच बुधवारी दुपारी धामणकर नाक्यावरील टेम्पो स्टँडसमोर एका दुचाकीवरून गुटखा पान मसाल्याचे दोन थैले भरून ते चोरट्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. जागरूक नागरिकांनी भोईवाडा पोलिसांना पाचारण करून सुगंधित गुटखा पान मसाला पदार्थांचा साठा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. मात्र यावेळी गर्दी जमल्याने दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून ५० हजार रुपये किमतीच्या हिरो होंडा दुचाकीसह ११ हजार ७०० रुपयांचा सुगंधित माल जप्त करून अज्ञात दुचाकीस्वारासह अन्य जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  घुगे करीत आहेत.