उप जिल्हा रुग्णालयासमोर वापरलेल्या पीपीई किटचा ढिगारा

भिवंडी: भिवंडी पालिकेच्या नियंत्रणाखालील राज्य शासनाचे स्व.इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालय हे कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोरोन रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर

 भिवंडी: भिवंडी पालिकेच्या नियंत्रणाखालील राज्य शासनाचे स्व.इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालय हे कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोरोन रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर उपचार केले जाते तेथील डॉक्टरांसाठी शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून  पीपीई किट देण्यात आले आहेत. मात्र वापरलेले पीपीई किट हे रुग्णालयाच्या बाहेर फेकून दिले जात. आहेत गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये त्या ठिकाणी पीपीई किटच ढिगारा जमा झाला आहे. या  किटची विल्हेवाट लावण्याकरिता कोणतीही यंत्रणा अथवा मशीन नसल्याने हे पीपीई किट साचले असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.