कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ – कब्रस्तानात जून महिन्यात दफन होणाऱ्या मृतदेहांची संख्या चिंताजनक

भिवंडी : भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाने तब्बल ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात २५ नवे रुग्ण आढळले असून

भिवंडी : भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाने तब्बल ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात २५ नवे रुग्ण आढळले असून शहर व ग्रामीण भागात एकूण ६५ नवे रुग्ण आज आढळले आहेत. वाढत्या नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला असल्याने भिवंडीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तर वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी गुरुवार पासून मनपाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊन बरोबरच रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने शहरात रुग्णांच्या मृत्यू संख्येय वाढ होत असल्याचा आरोप मनपा प्रशासनावर करण्यात येत आहे.

एक जूनपासुन सुरु झालेल्या अनलॉककाळात भिवंडी शहरात वर्दळ वाढली शहरातही यंत्रमाग सुरु झाले तर शहर लगतच्या ग्रामीण भागात गोदाम सुरु झाल्याने लाखो नागरिक शहर बाहेर ये जा करू लागले त्या सोबतच ठाणे मुंबई कल्याण या भागातून नागरीकांची वर्दळ मोठ्या संख्येने वाढल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ़ होत आकडा ७२७ वर जावुन पोहचली .त्यासाठी पुन्हा एकदा १८ जुन पासुन १५ दिवसांकरीता लॉकडाऊन सुरु करण्यात आला .परंतु हा लॉक डाऊन लावण्या ऐवजी शहरातील आरोग्य सुविधा सुधारणे गरजेचे असल्याचे मत अनेकां कडून व्यक्त होत असतानाच , शहरात एक जून नंतर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे हे शहरातील कब्रस्ताना मधील दफन मृतदेहा वरून स्पष्ट होत असतानाच शहरात गुरुवारी ३३ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे जाहीर केल्याने खळबळ उडाली तर काही नगरसेवकांनी मृत्यूचा आकडा महानगरपालिका प्रशासन लपवीत असल्याचा आरोप नगरसेवक निलेश चौधरी यांनी केला आहे .  

 शहरात २२ कब्रस्तान व २१ स्मशानभूमी या ठिकाणी दररोज अधिक संख्येने अंत्यसंस्कार व दफनविधी पार पडत असून शांतीनगर भागातील गैबीपीर कब्रस्तान या ठिकाणी  जून महिन्यातील १८ दिवसात तब्बल ८६ मृतदेह दफन झाले त्यापैकी ५ कोरोना पॉझिटिव्ह होते पण इतर मृतदेह वयस्कर ७० ते ८० वर्षांच्या व्यक्तींचे वेळेवर उपचार मिळू न शकलेल्या व्यक्तींचे असल्याचे गैबीपीर कब्रस्तानाचे विश्वस्त अक्रम अन्सारी यांनी सांगत , सध्या दररोज ५ ते ८ मृतदेहांचे दफन विविध कब्रस्तानात होत असल्याने कबर खोदणारे अधिकच्या कामाच्या ताणाने आजारी पडले असून आता परिसरातील युवकां कडून कबर  खोदण्याचे काम करून घेण्याची वेळ आली आहे अशी माहिती दिली . दरम्यान स्थानिक पोलिसांकडून कब्रस्तानाची देखरेख पाहणाऱ्या विश्वस्तांना नोटिसी बजावून मृतांची दरदिवशी माहिती देण्याचे बंधन टाकले आहे . शहरातील गैबी पीर कब्रस्तान सारखीच परिस्थिती रेहमतपूर कब्रस्तान पाच पीर कब्रस्तान , बडा कब्रस्तान , कोटर गेट कब्रस्तान , आएसबीबी कब्रस्तान येथे असून मागील वर्षाच्या सरासरीत जून महिन्यात अधिक मृतदेह दफन करण्यात आल्याचे उघड होत असून शहरात लॉक डाऊन लावून नव्हे तर नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देऊन त्यांना वेळीच ऑक्सीजनचा पुरवठा मिळवून देण्या सोबत शहरातील खाजगी रुग्णालय ताब्यात घेऊन गरीब नागरीकांवर महानगरपालिकेने उपचार करण्याची गरज असल्याची माहिती माजी नगरसेवक फारुख अन्सारी यांनी दिली . 

शहरात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना संसर्गाची साखळी तोंडाने गरजेचे असल्याने संपूर्ण शहर १५ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे तर अचानक रुग्ण मृत्यू संख्या वाढली नसून गुरुवारी दर्शविलेले ३३ मृत्यू हे एकाच दिवसांचे नसून ९ जून ते १७ जून दरम्यानचे असून शासकीय व खाजगी रुग्णालयातून डेथ समरी वेळेत न आल्याने ही संख्या वाढली असून येथून पुढे डेथ समरी त्या त्या दिवशीच ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे येईल या बाबत दक्षता घेण्यात आली आहे अशी माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे . शहरात रुग्णांना ऑक्सीजन सुविधा न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची ओरड होत असून त्या बाबत शहरातील एकमेव शासकीय आयजीएम कोव्हीड रुग्णालयात पूर्वी ३७ बेड वर ऑक्सीजन होते ते वाढवून ३१ अजून केले असून उर्वरित ३२ बेड येत्या चार दिवसात ऑक्सीजन व्यवस्था होणार असल्याने हे  रुग्णालय परिपूर्ण होणार आहे त्या सोबत जे दोन सीसीसी सेंटर आहेत तेथे ३० जम्बो व ३० छोटे ट्रॉली सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले असून शासना कडून १५ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन यंत्र मिळाले आहेत त्याव्यतिरिक्त १०० यंत्रांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या कडे दिला असून हि यांते शहरातील विविध भागात ठेवून रुग्णांना ऑक्सीजन देण्या बाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .