गैरसमजातून दारुड्याची हॉटेलमालकास मारहाण

भिवंडी: शहरातील राहनाळ येथील मुनीसुरत कंपाउंडमधील दैवीक हॉटेलच्या मालकास दारुड्याने गैरसमजातून मोटार सायकलच्या शॉकअपसरने डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी कल्याची घटना घडली आहे.या मारहाणीप्रकरणी

 भिवंडी: शहरातील राहनाळ येथील मुनीसुरत कंपाउंडमधील दैवीक हॉटेलच्या मालकास दारुड्याने गैरसमजातून मोटार सायकलच्या शॉकअपसरने डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी कल्याची घटना घडली आहे.या मारहाणीप्रकरणी दारुड्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश शिवललित मिश्रा उर्फ झिंग्या असे गुन्हा दाखल झालेल्या दारुड्याचे नाव आहे. गोपालदास गौड असे मारहाणीत झखमी झालेल्या हॉटेलमालकाचे नाव आहे. या घटनेचे अधिक वृत्त असे की १६ जून रोजी अविनाश हा दारूच्या नशेत मोटार सायकलवरून गटारात पडल्याने त्यास गोपालदास याने गटारात पाडले या गैरसमजातून त्या गोष्टीचा राग मनात धरून अविनाशने त्याच्या हातातील रॉडने गोपालदासच्या डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले आहे.या घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख करीत आहे.