भिवंडीत लोकप्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आल्या या मागण्या

भिवंडी : सध्याच्या कोरोना संसर्ग काळात देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असताना भिवंडीसारख्या कामागरवर्गाचा भरणा मोठ्या संख्येने असलेल्या शहरातील कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या मालमत्ता करात महासभेने सूट देण्याची घोषणा केली असतानाच आता ज्या नागरिकांच्या मालमत्ता करावर व्याज आकारणी केली आहे त्यांना पुन्हा एकदा अभय योजनेचा अवलंब करीत १०० टक्के व्याज माफीची घोषणा करावी, अशी मागणी सभागृह नेते विलास पाटील यांनी सर्व पक्षीय गटनेते यांच्या प्रशासनासोबतच्या बैठकीत(meeting) केली आहे .

भिवंडी(bhivandi) महापालिका महापौर प्रतिभा पाटील(pratibha patil) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आयुक्त डॉ पंकज आशिया, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपमहापौर इम्रान खान, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, शिवसेना गटनेता संजय म्हात्रे, भाजपा गटनेता हनुमान चौधरी व महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या कामात समन्वय साधून शहरातील नागरीकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न अशा बैठकांचे आयोजन करून येत असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली.

या बैठकीत महानगरपालिका प्रशासनाकडे पडून असलेल्या ५० घंटागाड्या या खाजगी ठेकेदारांच्या ताब्यात देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याबाबत चर्चा करताना सभागृह नेता विलास पाटील यांनी महानगरपालिकेकडे या सर्व गाड्यांवर काम करण्यासाठीचे मनुष्यबळ नसताना त्या पडून राहत असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून त्या सर्व गाड्या काही वर्षे ठेकेदार पद्धतीने रस्त्यावर आणाव्यात यामुळे महानगरपालिकेचे दरमहा खर्च होणारे पैशांची बचत होणार असून ती वाहने ठेकेदारांकडून सुस्थितीत पुन्हा महानगरपालिकेस घेता येतील अशा सूचना लोकप्रतिनिधींनी मांडल्या.

शहरात ठिकठिकाणी डेब्रिज मोठ्या प्रमाणावर जमा होत असून तो उचलून नेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ठेकेदार नेमून त्यास डेब्रिज उचलण्याचा वाहन खर्च देण्या बाबतचा प्रसत्व चर्चेस ठेवला असता महानगरपालिकेने डेब्रिज उचलण्यासाठी ठेकेदार नेमून त्यांच्याकडून प्रति ट्रक शंभर रुपये फी वसूल करावी जेणे करून महानगरपालिका क्षेत्रातील डेब्रिज उचलले जाईल व महानगरपालिका तिजोरीत पैसे जमा होतील असा प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी कडून देण्यात आला असून येत्या महासभेत या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाने द्यावा अशा सूचना करण्यात आल्याची माहिती सभागृह नेते विलास आर पाटील यांनी दिली आहे .