भिवंडीत पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद ; बाजारपेठेत शुकशुकाट

भिवंडी: शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मनपा प्रशासनाने पंधरा दिवसांचा प्रतिबंधित परिसर करून शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महासभेत जाहीर केला आहे. आजपासून हा पंधरा दिवसांचा

 भिवंडी: शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मनपा प्रशासनाने पंधरा दिवसांचा प्रतिबंधित परिसर करून शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महासभेत जाहीर केला आहे. आजपासून हा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाल्याने शहरातील सर्व दुकाने व बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेऊन या लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवल्याने आज शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये पूर्णतः शुकशुकाट दिसला. 

या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले असून नागरिकांनी स्वतःहून आपला परिसर कंटेनमेंट करून लॉकडाऊन करावा ,असे आवाहन देखील मनपाच्या वतीने करण्यात आला आहे. शहरातील तीनबत्ती भाजी मार्केट बंद राहणार असून शहरात फिरत्या पध्दतीने भाजीपाला विक्री केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान लॉकडाऊनमधून बँक, सरकारी कार्यालय, किराणा दुकान, औषधांची दुकाने व दूध विक्रेत्यांना वगळण्यात आले असून अत्यावश्यक सेवा देणारी दुकान सामाजिक अंतर नियमांचे पालन करून सुरू राहणार असून इतर सर्व व्यवसाय बंद राहणार असल्याच पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते वगळता अंतर्गत सर्व रस्ते यांची बॅरिकटीग करून पुढील पंधरा दिवसांकरिता संपूर्ण शहरामध्ये कंटेनमेंट करण्यात आल्याने शहरातील सर्व रस्त्यावरदेखील शुकशुकाट दिसला.