भिवंडी महापालिकेने घोषित केलेला १५ दिवसांचा लॉकडाऊन बेकायदेशीर – खालिद गुड्डू

भिवंडी: भिवंडी निजामपूर शहर महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाला कोरोनाचा फैलाव रोखण्यावर आलेले अपयश झाकण्यासाठी त्यांनी बेकादेशीरपणे शहरात १५ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केल्याचा आरोप एआयएमआयएमचे

भिवंडी: भिवंडी निजामपूर शहर महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाला कोरोनाचा फैलाव  रोखण्यावर आलेले अपयश झाकण्यासाठी त्यांनी बेकादेशीरपणे शहरात १५ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केल्याचा आरोप एआयएमआयएमचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी केला आहे. शिवाय लॉकडाऊन घोषित करण्याचा अधिकार केवळ देशाचे पंतप्रधान अथवा राज्याचे मुख्यमंत्री यांनाच असून जर २४ तासात लॉकडाऊन मागे घेतला नाही. तर महापालिकेसमोर उग्र जनांदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 
भिवंडी शहर महापालिकेने गुरुवारपासून शहरात १५ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.शिवाय या लॉकडाऊनच्या निर्णयासाठी विशेष महासभेचे आयोजन करून त्यामध्ये शहरात १५ दिवसांचा लॉकडाऊनचा विषय मंजूर करण्यात आला आहे.या महासभेसाठी नगरसेवकांची गणपूर्ती देखील पूर्ण नव्हती तरी देखील बेकायदा ठराव मंजूर केला आहे.तसेच आधीच शहरातील व्यवहार अडीच महिने ठप्प आहेत.त्यातच पुन्हा लॉकडाऊन घोषित करून शहरवासीयांना वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी व पालिका प्रशासन  करीत असून नागरिकांना कोरोनावर योग्य उपचार मिळत नसल्याने  त्यांचे  मृत्यू होत आहेत. हेच अपयश झाकण्यासाठी महापौर प्रतिभा पाटील यांनी बेकायदा कॉलडाऊन घोषित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तर मनपा अधिकारी आणि सत्ताधारी  सुरुवातीपासूनच  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरले असून केवळ कोरोनाच्या नावाने मोठ्या प्रमाणात आर्थिक  भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोपही खालिद गुड्डू यांनी केला आहे. दरम्यान महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९चे उल्लंघन करून महासभेत लॉकडाऊनचा मंजूर केलेला ठराव  महाराष्ट्र सरकारने रद्द करावा, अशी मागणी खालिद गुड्डू यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तर भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याकडे महापौर आणि पालिका  आयुक्त यांच्याविरोधात  भारतीय दंड संहिता विधान  १६६ , १६६ (अ) , १६७ , १९१ , १९२ , १९८ , १९९, २००, ४६४, ४६६, ४६८,४७० या कलमानुसार फौजदारी कारवाईसाठी लेखी तक्रार केल्याने शहरवासीयांसाठी हा विषय चर्चेचा ठरला आहे.