भिवंडीत सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी

भिवंडी: शहरातील मुख्य बाजारपेठ तीनबत्ती, पोगाव, म्हाडा कॉलनी, धामणकर नाका, गैबिनगर केएनजी चौक आदी ठिकाणे भाजी मार्केट भरले जाते. शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील

भिवंडी: शहरातील मुख्य बाजारपेठ तीनबत्ती, पोगाव, म्हाडा कॉलनी, धामणकर नाका, गैबिनगर केएनजी चौक आदी ठिकाणे भाजी मार्केट भरले जाते.  शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील नागरिकांना याचे गांभीर्य कळत नाही. शहरातील गैबिनगर भाजी मार्केट तसेच पोगाव  इथे भाजीपाला केंद्रामध्ये  सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा होत असल्याचे बघायला मिळत आहे.

तीनबत्ती , पोगाव , म्हाडा कॉलनी, धामणकर नाका, गैबिनगर केएमजी चौक आदी ठिकाणी भाजी मार्केट भरले जाते. मात्र या सर्व ठिकाणी सोशल डीस्टन्स न ठेवता भाजी व फळ खरेदी केले जाते. मात्र प्रभाग अधिकारी व पोलीस यंत्रणा याबाबत काही करत नसल्याने सोशल डीस्टन्सचे भिवंडीत तीन तेरा वाजल्याचे दिसून येत असल्याने कोरोन्स पॉझिस्टिव्ह रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भिवंडीत कोरोनाने ६ रुग्ण असून क्वारंटाईन रुग्णाची संख्या १४४ झाली आहे.