भिवंडी शहरातील बाजारपेठेत प्रचंड वाहतूक कोंडी

भिवंडी: कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशात चौथा लॉकडाऊन सुरु झाला आहे. मात्र भिवंडीतील नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याने नागरिक आपली वाहने घेऊन बाजारपेठेत रोजच येत आहेत. त्यामुळे शहरात प्रचंड

 भिवंडी: कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशात चौथा लॉकडाऊन सुरु झाला आहे. मात्र भिवंडीतील नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याने नागरिक आपली वाहने घेऊन बाजारपेठेत रोजच येत आहेत. त्यामुळे शहरात प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. गेेल्या २ दिवसांपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंडई परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांच्या या हलगर्जीपणामुळे प्रशासन वारंवार सांगूनही नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी , अशी मागणी दक्ष नागरिक करीत आहेत.