dying company bhivandi

भिवंडी: भिवंडी (bhivandi) शहर परिसरात कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यांमध्ये(dying companies) असलेल्या बॉयलरमध्ये पाणी गरम करण्यासाठी कोळसा व लाकूड जाळण्याऐवजी प्लास्टिक आणि कापडी चिंध्यांच्या कचऱ्यासह रासायनिक द्रव्य जाळण्यासाठी वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भिवंडी: भिवंडी (bhivandi) शहर परिसरात कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यांमध्ये(dying companies) असलेल्या बॉयलरमध्ये पाणी गरम करण्यासाठी कोळसा व लाकूड जाळण्याऐवजी प्लास्टिक आणि कापडी चिंध्यांच्या कचऱ्यासह रासायनिक द्रव्य जाळण्यासाठी वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डाईंग सायजिंगमध्ये प्लास्टिकसह कचरा कपड्याच्या चिंध्या जाळल्या जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण(pollution) होऊ लागले आहे. त्यामुळे कल्याण रोड गोपाळनगर परिसरात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना खोकला, दमा याच बरोबर अन्य प्रकारचे आजार जडत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचाही त्रास होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेवकांसह स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे तर दुसरीकडे प्लास्टिकचा थेट वापर डाईंग व सायजिंग चालक मालक अशाप्रकारे करीत असल्याने या डाईंग व सायजिंग मालकांकडून शासनाचा नियमांची पायमल्ली होत आहे.शहरातील कल्याण रोड,शास्त्रीनगर,लाहोटी कंपाऊंड, खोका कंपाऊंड, कणेरी, दरगाह रोड, नारपोली, भंडारी कंपाऊंड अशा विविध नागरीवस्ती लगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात डाईंग व सायजिंग कंपन्या आहेत.

या यंत्रमाग कारखान्यांमध्ये तयार झालेल्या कपड्यावर रंगाची प्रक्रिया गरम पाण्यात केली जाते. त्यासाठी सायजिंग डाईंगमध्ये मोठ्या बॉयलरमध्ये दगडी कोळसा व लाकूड टाकून पेटवून पाणी गरम केले जाते. मात्र सध्या दगडी कोळसा व लाकूड महाग झाल्याने डाईंग व सायजिंग कंपनी मालक सायजिंगमध्ये जळणासाठी प्लास्टिक व कापडी कचरा चिंध्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे विविध भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे

.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डाईंग व सायजिंग कंपनी मालक लाकूड, दगडी कोळसा ऐवजी प्लास्टिक पिशवी आणि वेस्टेज कापडी चिंध्यांचा कचरा वापरत आहेत. डाईंग व सायजिंग कंपनी मालकांच्या या आर्थिक बचतीचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह महिला,शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना खोकला,दमा यासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे भिवंडीत प्रदूषण करणाऱ्या या डाइंग सायजिंग कंपनी मालकांवर पालिकेचे अधिकारी व कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत पालिकेचे विरोधी पक्षनेते  यशवंत टावरे यांनी आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे व कारवाई करावी अशी मागणी केली आहे.