भिवंडीतील त्या माय लेकांच्या मृत्यू प्रकरणी कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

भिंवडी (bhivandi)तालुक्यातील पाच्छापुर येथील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या माय - लेकांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा(crime) दाखल केला आहे.

भिवंडी: भिंवडी (bhivandi)तालुक्यातील पाच्छापुर येथील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या माय – लेकांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा(crime) दाखल केला आहे.

उंबरखांड पाच्छापुर येथील श्रीपत पांगारे याची पत्नी रंजना पांगारे व तीन चिमुकल्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. पोलिसांना जंगलात हे मृतदेह गुरुवारी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तर पत्नी व तीन मुलांचे मृतदेह बघून श्रीपत व त्यांच्या दुसर्‍या पत्नीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर सध्या जे. जे. हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरू आहेत. मात्र श्रीपत बांगारे याने दुसरे लग्न केल्याने पत्नी रंजना हीच्यासोबत त्याचे खटके उडत होते. शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात मृत चौघा मायलेंकावर उंबरखांड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तपासाअंती पडघा पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीपत पांगारे व त्याची दुसरी पत्नी सवीता गांगड यांच्यावर गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके हे करीत आहेत.