भिवंडी वाहतूक शाखेची ६०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

भिवंडी: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रुणामध्ये वाढ होत असताना वाहन चालक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याने भिवंडी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून सहाशे वाहन

भिवंडी: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रुणामध्ये वाढ होत असताना वाहन चालक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याने भिवंडी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून सहाशे वाहन चालकांवर कारवाई करून वाहतूक विभागाच्या अॅपद्वारे दंडाची कारवाई केली.

भिवंडी शहरात गेल्या चार दिवसांपासून वाहतूक शाखेच्या कल्याण नाका, राजीगांधी चौक , नारापोली ,कोनगाव या कार्यालयामार्फत नाकाबंदी करून मोटार सायकल, रिक्षा , चारचाकी वाहनांमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन न करता मोटार सायकलवर दोन किंवा तीन जण बसून वाहन चालवताना ४९६ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच तीन चाकी व रिक्षा चालक असलेल्या ६६ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच ३८ चारचाकी वाहन चालकांसह सहाशे वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून अॅपद्वारे दंड वसूल करण्यात आला. तर दोन मोटार सायकल चालकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायाने ,दिनेश कटके ,कल्याणजी घेटे यांनी दिली.