भिवंडी महापालिकेला कचरामुक्त शहरांच्या मानांकनात ३ स्टार मानांकन प्राप्त

भिवंडी: भिवंडी शहरात राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे मूल्यांकन करण्याकरता घेण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेच्या विविध निकषांपैकी एक म्हणजे कचरा मुक्त शहर तारांकित मानांकन.

 भिवंडी: भिवंडी शहरात राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे मूल्यांकन करण्याकरता घेण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेच्या विविध निकषांपैकी एक म्हणजे कचरा मुक्त शहर तारांकित मानांकन. यामध्ये शहरातील घनकचऱ्याचे संकलन व वाहतूक , ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण डम्पिंग ग्राउंड क्षेपणभूमी वरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट संस्था, जलस्त्रोत व नाले सफाई व नाले सफाई शहरातील साफसफाई याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया या बाबींचे परीक्षण केंद्रीय पथकाने  जानेवारी २०२० मध्ये केले होते. केंद्र  शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे  १९ मे  रोजी घोषित झालेल्या कचरामुक्त शहर तारांकित मानांकन स्पर्धेच्या निकालानुसार भिवंडी महापालिकेस ३ स्टार असे मानांकन मिळाले असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांंनी पत्रकारांना दिली.

शहरातील कचरा जमा करण्याच्या पद्धतीबाबत काही सुधारणा झाली आहे.कचरामुक्त शहर म्हणून महापालिकेला यंदा ३ स्टार रेटींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये केलेल्या सुधारणोमुळे, तक्रारी सोडविण्यामध्ये आणि कच-याची योग्य रितीने हाताळणी केल्यामुळे पालिकेला हा क्रमांक मिळाला असल्याचे आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी पत्रकारांना सांगितले. केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दैनंदिन सफाई, हागणदारीमुक्त,प्लास्टिक  बंदी, नालेसफाई अदि कामावर यावर केंद्र सरकारचा भर होता.त्यानुसार पालिकेचा कारभार सुधारल्याचे दिसून आले परिक्षकांना दिसुन आले.पालिका कार्यक्षेत्रात दररोज सुमारे २८० हद्दीत टन कचरा निर्माण होतो.डम्पींग ग्रांऊड वर कचरा व्यवस्थापन योग्य पध्दतीने  हाताळल्याचा निष्कर्ष परिक्षकांनी नोंदविला. त्यामुळे पालिकेला ३ स्टार मिळाला आहे.