भिवंडीत ९१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

भिवंडी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वात आधी पानपट्टी बंद ठेवण्याचे आदेश निघाले. परंतु त्यानंतरही लॉकडाऊन काळात प्रतिबंधित गुटखा ठिकठिकाणी सर्रास विक्री होताना आढळून आला , तर दरम्यान

 भिवंडी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वात आधी पानपट्टी बंद ठेवण्याचे आदेश निघाले. परंतु त्यानंतरही लॉकडाऊन काळात प्रतिबंधित गुटखा ठिकठिकाणी सर्रास  विक्री होताना आढळून आला , तर दरम्यान मागील महिन्यात दोन वेगवेगळ्या कारवाईत कोट्यावधी रुपयांचा गुटखा जप्त करण्याची कारवाई केल्याचे उदाहरण ताजे असतानाच पुन्हा एकदा नारपोली पोलीस ठाणे क्षेत्रातील पुर्णा या ठिकाणी तब्बल ९१ लाखांचा गुटखा जप्त करण्यात अन्न सुरक्षा पथकाने यश मिळविले आहे.  भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत क्षेत्रातील द्रौपदी छाया कंपाऊंड येथे जय भवानी फ्राईट कॅरियरच्या दोन गोदामात बंदी काळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचे विक्रीसाठी  साठवणूक , वाहतूक करण्यास मनाई असताना त्याची वाहतूक करून साठवणूक केल्या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी मनीष सानप यांनी नारपोली पोलीस ठाण्यात मोहम्मद अली रहेमान शेख ; ट्रान्सपोर्ट चालक , राजेश मिश्रा ,प्रतिबंधित गुटखा साठवणूक करणारा व्यापारी , गोदाम मालक विशाल जाधव , आशु गुप्ता व वाहन क्रमांक एमएच ०४ एचडी २२७० चे अज्ञात मालक यांच्या विरोधात तक्रार दिली आहे . नारपोली पोलिसांनी या पाचही आरोपीं विरोधात प्रतिबंधित गुटखा व्यसाया संबंधित विविध कलमांसह भा.दं.वि. कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्हरकटे हे करीत आहेत .