भिवंडीतून आजमगढ उत्तर प्रदेशसाठी विशेष श्रमिक ट्रेन आज रवाना

भिवंडी: लॉकडाऊनमुुळे भिवंडीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे.आज सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी उत्तरप्रदेश अजमगढसाठी विशेष

 भिवंडी: लॉकडाऊनमुुळे भिवंडीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे.आज सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी उत्तरप्रदेश अजमगढसाठी विशेष श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून रवाना झाली. या ट्रेनमधून १५९० प्रवासी रवाना झाले आहेत. यापूर्वी देखील अशाच प्रकारे बिहार मधूबनी, गोरखपूर, जयपुर, आणि पटनासाठी विशेष ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे ,तहसिल्दार शशिकांत गायकवाड , नायब तहसीलदार महेश चौधरी, यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत यावेेेळी कामगारांना निरोप दिला.