भिवंडीतून सहावी विशेष श्रमिक ट्रेन बिहारसाठी रवाना

भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार नगरी भिवंडीत अनेक परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत. अशा कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक

 भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार नगरी भिवंडीत अनेक परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत. अशा कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी बिहार मधुबनीसाठी सहावी विशेष श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून रवाना झाली. या ट्रेनमधून १४५० प्रवासी बिहार मधुबनीसाठी रवाना झाले. यापूर्वीदेखील अशाच प्रकारे बिहार मधुबनीसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. तर त्याआधी गोरखपूर, जयपुर, आणि पटनासाठी विशेष ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ .मोहन नळदकर, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, तहसीलदार शशिकांत गायकवाड यांसह पोलीस, मनपा व महसूलसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत यावेेेळी कामगारांना निरोप दिला.