भिवंडीत वाईन शॉपसमोर शहराबाहेरच्या लोकांची गर्दी कमी करण्यासाठी आधारकार्ड असलेल्यालाच दारू देण्याचा दुकानदारांचा निर्णय

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वाईन्स शॉप दुकाने उघडण्यात आली. मात्र दारू खरेदीसाठी ग्रामीणसह भिवंडी, ठाणे ,कल्याण, वसई येथील मद्यप्रेमींचा ओघ ग्रामीण भागातील वाईन्स दुकानाकडे वळल्याने स्थानिक

 भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वाईन्स शॉप दुकाने उघडण्यात आली. मात्र दारू खरेदीसाठी ग्रामीणसह भिवंडी, ठाणे ,कल्याण, वसई येथील मद्यप्रेमींचा ओघ ग्रामीण भागातील वाईन्स दुकानाकडे वळल्याने स्थानिक दुकानदार हैराण झाले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनी आधारकार्ड आणल्याशिवाय दारू मिळणार नाही, अशी भूमिका दारू विक्रेते दुकानदारांनी घेतल्यामुळे अनेक तळीरामांना हात हलवत परत जावे लागले आहे तर आधारकार्ड असलेल्या महिलांसह पुरुष वर्गाने सकाळपासून दारू घेण्यासाठी दुकानाबाहेर गर्दी केल्याने पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी छडीचा मार देत दुकानापासून रांग लावण्यासाठी प्रवृत्त केले . भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात वाईन्स शॉप दुकाने उघडण्यास आली आहेत. त्यामुळे आठ  दिवसांपासून या दुकानांबाहेर दारू खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत मोठी गर्दी होत आहे .विशेष म्हणजे या गर्दीत भिवंडी शहरासोबत ठाणे, कल्याण, उल्हासनगर, वसई भागातील ग्राहक दारू घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे दुकानदारासह बंदोबस्तावर असलेले पोलीस हैराण झाले आहेत. अखेर यावर उपाय म्हणून दुकानदारांनी ज्या ग्राहकांकडे आधारकार्ड असेल त्यालाच दारू दिली जाईल. अशी भूमिका वाईन शॉप दुकानदारांनी घेतली आहे त्यामुळे दारूसाठी बाहेरील तालुक्यातून नागरिकांना हात हलवत परत जावे लागले तर अनेकांकडे आधारकार्ड असल्याने त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळता गर्दी केली.