भिवंडी – अंबाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात

रस्त्याची दुरावस्था झालेली असताना ठेकेदाराने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आजपावेतो सुरू केलेले नाही. त्यामुळे शेलारगाव परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यातच गणेशोत्सव सुरू असल्याने भाविकांना या खड्यांचा सामना करून देवदर्शना करीता ये - जा करावी लागत आहे. येत्या दोन दिवसात खड्डे बुजविले नाहीत तर रास्ता रोको आंदोलन केले जाईल.

भिवंडी : भिवंडी – वाडा या राष्ट्रीय महामार्गावरील शेलार ग्रामपंचायत हद्दीपासून ते अंबाडीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात तडे जाऊन रस्ता फुटला आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. हा रस्ता येत्या दोन दिवसात दुरुस्त न केल्यास शेलार शिवसेना शाखेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना जिल्हा सचिव रमेश गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे शेलार परिसरातील नागरिक व वाहन चालकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याची दुरावस्था झालेली असताना ठेकेदाराने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आजपावेतो सुरू केलेले नाही. त्यामुळे शेलारगाव परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यातच गणेशोत्सव सुरू असल्याने भाविकांना या खड्यांचा सामना करून देवदर्शना करीता ये – जा करावी लागत आहे. येत्या दोन दिवसात खड्डे बुजविले नाहीत तर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हा सचिव रमेश गायकवाड रमेश यांनी दिला आहे.