भिवंडी महानगर पालिकेचे कर्मचारी सावकाराच्या विळख्यात

पालिकेचे स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी भूकमारीच्या वाटेवर

भिवंडी : भिवंडी नागरपालिकेचे रुपांतर महापालिकेत होऊन २० वर्ष होत आहेत. मात्र आजही पालिकेचे स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी सावकाराच्या विळख्यात सापडल्याने या कर्मचारी व त्याच्या कुटुंबियांवर भूकमारी ची वेळ आल्याने  आम्हाला कोन्ही वाचविल का ? या विवंचनेत असल्याने  महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनीं संबधीत सावकारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पालिका कर्मचारी संघटने मार्फत होत आहे. 

कोरोना च्या प्रादुर्भावामुले कर्मचाऱ्यांना वेळेवरती पगार मिळत नसल्यामुळे आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नाईलाजाने स्वच्छता व आरोग्या विभागाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी शहरातील विविध सावकारांकडून हात उसने पैसे व्याजावर घेतात व त्यापोटी आपले बँक पासबुक व ए .टी .एम कार्ड  हे सावकाराकडे जमा करावे लागतात, असे असतांना कर्मचाऱ्यांचे  पगार ज्या दिवशी बँकेत जमा होतात त्याच्या आदल्यादिवशी बँक कर्मचारी व पालिकेचे आस्थापन विभागातुन संबंधीत सावकाराला कळविले जाते. बँके जसा पगार जमा होतो लगेच सावकार किंवा त्याची माणसे  ए .टी .एम  कार्ड द्वारे  त्या कर्मचाऱ्यांचे पैसे व्याजासह काढून घेत असल्याने त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी पैसे उरल्याने आपले कुटुंब कसे चालवायचे  या विवंचनेत ते राहत असल्याने मुलांचे शिक्षण व त्यांचा उदरनिर्वाहाचा गहन प्रश्न चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसमोर पडल्याने आत्महत्येशिवाय त्यांच्या कडे पर्याय उरला नाही,  यामुळे काही कर्मचाऱ्यांना हृदय विकाराचा झटका येऊन गेल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणने आहे. तर गेली अनेक वर्ष मुद्दल व त्यावरील व्याज भरूनही घेतलेले कर्ज जैसे थे अश्या परिस्थितीत आहे.  त्यामुळे पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी संबंधित सावकारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वाचवावे अशी मागणी संघटनेने केली आहे