मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्ष सचिन वाझे यांना आता अटकेची भिती आहे. यासाठीच त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांचा जामीन कोर्टाने तात्पुरता फेटाळला आहे. पुढील सुनावणी १९ मार्चला होणार आहे.

    ठाणे : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्ष सचिन वाझे यांना आता अटकेची भिती आहे. यासाठीच त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांचा जामीन कोर्टाने तात्पुरता फेटाळला आहे. पुढील सुनावणी १९ मार्चला होणार आहे.

    २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास सुरू आहे. या दरम्यानच्या काळात या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्कॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदरच्या खाडीत आढळून आला होता.

    या प्रकरणी विरोधकांनी वाझेंवर खळबजनक आरोप केलेत. तसेच वाझेच्या अटकेती मागणी करत विरोधकांनी विधानसभेत मोठा गदरोळ घालत होता. विरोधकांच्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १० मार्च रोजी सभागृहातून वाझे यांना क्राइम ब्रांचमधून हटवण्यात आल्यांची घोषणा केली. त्यानंतर १२ मार्च रोजी रात्री उशीरा त्यांना क्राइम ब्रांचमधून नागरी सुविधा केंद्र विभागात हलवण्यात आले.

    सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप

    प्रश्नोत्तरांच्या तासानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मयत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या पोलीसांना देण्यात आलेल्या जबाबातील काही मजकूर वाचून दाखवला. त्यात सचिन वा झे यांनी आपल्या पतीला अंबानी प्रकरणात अटक व्हावे म्हणून दबाव आणल्याचे म्हटल्याचे तसेच वाझे यांनीच खून केल्याचा उल्लेख असल्याचे ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की, चाळीस लाख रूपयांच्या मिरा भाईंदर येथील जुन्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या धनंजय गावडे यांच्याकडे हिरेन यांचे शेवटचे लोकेशन सापडले आहे. तसेच वाझे आणि गावडे हे त्या खंडणी प्रकरणात आरोपी आहेत असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे वाझे यांना कलम २०१ अन्वये तातडीने अटक करून चौकशी करावी अशी मागणी त्यानी केली. यावेळी भाजप सदस्य आक्रमक झाले त्यांना वेलमध्ये येवून आक्रमक पणे घोषणाबाजी सुरू केली.