accident

भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या पिंपळास गावातील भूमिवर्ल्ड या गोदाम संकुलनाच्या बाजूला या महामार्गावरून जाणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे .

भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावर(mumbai nashik highway) असलेल्या पिंपळास गावातील भूमिवर्ल्ड या गोदाम संकुलनाच्या बाजूला या महामार्गावरून जाणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात(accident) दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला(bike rider dead) असल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, कुंदन उपेंद्र झा असे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला असून या फरार वाहनचालका विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते.