कल्याण : कोरोनाच्या मुक्तीसाठी गेल्या ३ महिन्यांपासून राज्य सरकारने कोणतेही ठोस धोरण अवलंबले नाही. स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड सुरू आहे, राज्यभरात शेतमाल खरेदी न करण्यासह

 कल्याण : कोरोनाच्या मुक्तीसाठी गेल्या ३ महिन्यांपासून राज्य सरकारने कोणतेही ठोस धोरण अवलंबले नाही.  स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड सुरू आहे, राज्यभरात शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, राज्यातील गरिबांना रेशनधान्य मिळत नाही, उलट त्यामध्ये घोटाळे सुरू आहेत. यासोबतच राज्यातील आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे, सातत्याने रुग्णसंख्या लपविली जात आहे. कोरोनाने बाधित मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही. अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले. राज्यातील ११ कोटी जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने कार्यवाही करावी, यासाठी भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना करत नाही. देशातील इतर राज्ये विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवुन राजकारण करत आहे. राज्यातील पोलिसांची अवस्था तर अतिशय विदारक आहे. त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे भाजपाने या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण पूर्वचे भाजपा अध्यक्ष संजय मोरे, कल्याण पश्चिमचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मांडा टिटवाळा मंडल अध्यक्ष सुभाष पाटील, रवी सिंग ठाकूर, राजू शेख, सौरभ सिंग, रमेश कोनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.