भिवंडीतील विधानसभेचे भाजपा आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण

भिवंडी: भिवंडी पश्चिम येथील विधानसभेचे भाजपा आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील शहरात आणि भाजपा पक्षातील कार्यकर्ते तसेच नेत्यांमध्ये

 भिवंडी: भिवंडी पश्चिम येथील विधानसभेचे भाजपा आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील शहरात आणि भाजपा पक्षातील कार्यकर्ते तसेच नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आमदार महेश चौघुले यांचे खाजगी सुरक्षा रक्षक, चालक आणि सह्कारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे भाजपा आमदार महेश चौघुले यांनी कोरोनाची तपासणी केली होती. परंतु कोरोनाची तपासणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे महेश चौघुले यांना मुलुंड येथील फोर्टीड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तसेच त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात आमदार महेश चौघुले यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरले. तसेच अनेकांना धान्यवितरणासाठी सर्वत्र फिरत होते. त्यामुळे त्यांचा संपर्क हा असंख्य नागरिकांसोबत होत होता. या संपर्कामुळे महेश चौघुले यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं जात आहे. त्याचप्रमाणे या कोरोनाच्या संकटातून त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी भिवंडीकर नागरिक प्रार्थना करतील अशी प्रतिक्रिया शहर सरचिटणीस प्रेषित जयवंत यांनी दिली आहे.