Scholarships for meritorious students from Konkan from next year in memory of Vasantrao Davkhare

    ठाणे : भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. याबाबतची माहिती स्वतः डावखरे यांनी ट्वीट करून दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आवश्यक वाटल्यास चाचणी करून घ्यावी. तसेच, स्वतःची काळजी घ्यावी.असे आवाहन डावखरे यांनी केले आहे.

    मला सामान्य लक्षणे असून तब्येत चांगली आहे. सर्वांचे प्रेम,सदिच्छा आणि आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन.असा विश्वासही त्यांनी ट्वीटमधुन व्यक्त केला आहे.

    कोरोनाच्या काळात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी पक्षीय योगदानासाठी परराज्यातही त्यांनी दौरे केले होते. यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. अशी शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली.