bjp protest at thane

ठाणे  : वेबिनार महासभांऐवजी प्रत्यक्ष महासभा घेण्याच्या भाजपाच्या मागणीला सत्‍ताधारी शिवसेना व महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून सातत्याने डावलले जात असल्याच्या निषेधार्थ भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी आज ठिय्या आंदोलन केले.

ठाणे  : वेबिनार महासभांऐवजी प्रत्यक्ष महासभा घेण्याच्या भाजपाच्या मागणीला सत्‍ताधारी शिवसेना व महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून सातत्याने डावलले जात असल्याच्या निषेधार्थ भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी आज ठिय्या आंदोलन केले.(bjp protest against online meeting of thane corporation) त्यात सत्ताधारी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या महासभा वेबिनारमार्फत घेतल्या जात आहेत. कोरोना आपत्तीमुळे बंद केलेल्या महासभा गेल्या महिन्याभरापासून सुरू करण्यात आल्या. आज तिसरी महासभा होती. यापूर्वीच्या महासभेत भाजपचा नगरसेवकांचा आवाज म्युट करणे, नगरसेवकांना बोलू न देणे, विकासकामांविषयी चर्चा न होणे, कोरोनाच्या खर्चाविषयी प्रश्न डावलणे आदींमुळे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे.

या महासभामुळे ठाणेकरांच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तर सत्ताधारी पक्षाकडून बेकायदा खर्चावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, याकडे भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. लोकसभा, राज्यसभा आणि विधिमंडळाचे अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनाच्या काळात सर्व सदस्य, मंत्री आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, या अधिवेशनानंतर कोरोनाचा उद्रेक झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर राम गणेश गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महासभा भरवता येईल, अशी मागणी भाजपने यापूर्वीच केली होती. मात्र, त्याबाबत सत्ताधारी शिवसेना व महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात वेबिनार महासभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी  सभागृहाबाहेर भाजपने ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनात गटनेते संजय वाघुले यांच्याबरोबरच मिलिंद पाटणकर, अशोक राऊळ, संदिप लेले, मुकेश मोकाशी, मनोहर डुंबरे, कृष्णा पाटील, नंदा पाटील, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, सुवर्णा कांबळे, अर्चना मणेरा, कविता पाटील, कमल चौधरी, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, सुनील हंडोरे, आशादेवी सिंह आदी नगरसेवक सहभागी झाले होते.