शिक्षकांना वर्क फ्रोम होम देण्याची भाजपा शिक्षक आघाडीची मागणी

कोरोनाच्या प्रादुर्भाभावामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होत गेला तश्या टप्या टप्याने शासनाच्या नियमांच्या, मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच ज्या महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू नाहीत तेथे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्याप्रमाणे शिक्षकही आपले कार्य प्रामाणिक पणे करत आहेत.

    कल्याण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षकांना देखील वर्क फ्रोम होम देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाभावामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होत गेला तश्या टप्या टप्याने शासनाच्या नियमांच्या, मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच ज्या महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू नाहीत तेथे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्याप्रमाणे शिक्षकही आपले कार्य प्रामाणिक पणे करत आहेत. परंतु परिसरातील अनेक व्यक्ती शासनाच्या नियमाचे, मास्क लावणे, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना सर्वत्र वाढू लागला आहे व जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

    दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्या लाटेतील विषाणू हा अधिक शक्तिशाली व त्रासदायक असल्याने काळजी घेणे अगत्याचे आहे. अनेक भागात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील सुरू असल्या काही शाळांमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षक ही पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. तरी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्यच्या दृष्टीने सुरू असलेल्या शाळा बंद ठेवण्यात याव्यात. तसेच ५० टक्के शिक्षकांची उपस्थितिचा आग्रह न धरता त्यांनाही घरूनच ऑनलाईन लेक्चर्स घेऊ द्यावेत.

    विद्यार्थी, शिक्षक यांना लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे व त्यानंतरच शाळा सुरू कराव्यात. शाळा बंद पण शिक्षण सुरू या पद्धतीने कार्य केल्यास कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होईल यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पत्र निघावे यासाठी भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण उप संचालक, मुबंई यांना मेल द्वारे निवेदन देण्यात आले आहे.