BJP's focus on Thane; Omkar Chavan elected as State Secretary of Yuva Morcha

ठाणे :  महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि संख्याबळाच्या तुलनेत ठाणे जिल्हा हा महत्वाचा आहे. ठाण्यावर भाजप नेत्यांचीही नजर असून ठाण्यात संघटन वाढविण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीत ठाण्याला संधी दिल्याचे चित्र आहे. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी ठाण्यातील उच्चशिक्षित तरुण ओंमकर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

सचिवपदी ओमकार चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर ठाण्यातील भाजपच्या तसेच युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ओमकार चव्हाण यांना लहान पणापासून त्याच्या वडिलांकडून बाळकडू मिळाले आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना सामाजिक उपक्रम तसेच गोरगरीब माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चव्हाण धावून जात असतात, प्रभागातील नागरिकांचा दांडगा संपर्क असल्याने भाजपने ओंमकार चव्हाण यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे.

विधानसभा निवडणूक दूर असल्या तरीही वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाण्यात भाजप नियुक्त्यांवर जोर देत आहे. ओंमकर चव्हाण हा उच्चशिक्षित तरुण असून त्याच्यावर महाराष्ट्रातील  युवकाच्या  समस्या, नोकरी, ऍडमिशन, भाजपशी युवकांना जोडो अभियान, पर्यावरण, आणि उच्च शिक्षित तरुणांना भाजप युवा मोर्चात समाविष्ठ करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी त्याला नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान आमदार आशिष शेलार, संजय केळकर, ठाणे शहर भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी योगदान देणार असल्याचे यावेळी ओमकार चव्हाण यांनी सांगितले.