Blood donation camp in Kalamboli on the occasion of the birth anniversary of Loknete Gopinath Munde

नवी मुंबई : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोली येथे दैवत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व  जय भगवान युवा प्रतिष्ठान खांदा कॉलनी यांच्या संयुक्त माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कोरोनो मूळे  संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तूटवडा भासत आहेत अशा वेळी अनेक गंभीर स्वरूपाच्या रूग्णांना रक्ताची गरज भासते महाराष्ट्रातील ही गरज ओळखून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कळंबोली येथे या दोन्ही सामाजिक सघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला या दोन्ही मंडळाचे सल्लागार म्हणून जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व बबनराव ‌बारगंजे  हे  काम पहात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी जेष्ठ नेत्यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.