खतांचा बेकायदेशीर साठा भोवला, लाखोंचा साठा हस्तगत

अटक आरोपी आनंदा  चंद्रकांत पवार आणि विजय नरेंद्र ठक्कर यांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शीळ डायघर परिसरातील एकटा इंडस्ट्रियल इस्टेट, शीळ डायघर परिसरातील एका गोडाऊन मध्ये शेतकऱ्यांचा अनुदानित असलेला युरिया खताचा बेकायदेशीर साठा  करुन ठेवण्यात आल्याचे माहिती मिळताच पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सदरचा युरिया हा नर्मदा व्हॅली फर्टिलायझर कंपनी लिमिटेड गुजरात या पिशव्यांमध्ये भरण्यासाठी साथ केलेले खत सापडले.

ठाणे : शेतकऱ्यांचा अनुदानित युरिया खताची बेकायदेशीर साठवणूक करून तो नर्मदा व्हॅली फर्टिलायझर कंपनी लिमिटेडच्या पिशव्यांमध्ये भरून विकणाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा  साठेबाजांना ठाणे गुन्हे शाखा अमली विरोधी पथक आणि कृषी विभागाच्या पथकांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून साठवणूक केलेला ८ लाख ३१ हजार ११२ रुपयांचा युरिया खताचा साठा हस्तगत केला. अटक दोन्ही आरोपीना १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अटक आरोपी आनंदा  चंद्रकांत पवार आणि विजय नरेंद्र ठक्कर यांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शीळ डायघर परिसरातील एकटा इंडस्ट्रियल इस्टेट, शीळ डायघर परिसरातील एका गोडाऊन मध्ये शेतकऱ्यांचा अनुदानित असलेला युरिया खताचा बेकायदेशीर साठा  करुन ठेवण्यात आल्याचे माहिती मिळताच पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सदरचा युरिया हा नर्मदा व्हॅली फर्टिलायझर कंपनी लिमिटेड गुजरात या पिशव्यांमध्ये भरण्यासाठी साथ केलेले खत सापडले.

दरम्यान पोलीस पथकाने युरिया आणि बनावट कंपनीच्या पिशव्या असा ८ लाख ३१ हजार ११२ रुपयांचा माल हस्तगत केला. सोबत गोदामातील आरोपी आनंदा  पवार याला अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत पोलिसांनी आरोपी वीरेंद्र ठक्कर यालाही अटक केली. त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या दोन्ही आरोपींच्या विरोधात शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.