electricity shock

ऐरोलीतील(airoli) सेक्टर ८ येथील शिवशंकर प्लाझा २ येथील इमारतीच्या बाहेर लेन्सकार्ट दुकानासमोर विजेचा झटका लागून एका मुलाचा मृत्यू (death by electric shock)झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली.

    ऐरोली : ऐरोलीतील(airoli) सेक्टर ८ येथील शिवशंकर प्लाझा २ येथील इमारतीच्या बाहेर लेन्सकार्ट दुकानासमोर विजेचा झटका लागून एका मुलाचा मृत्यू (death by electric shock)झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    कामानिमित्त लोखंडी शिडी या ठिकाणी ठेवण्यात आली होती. या शिडीची उंची सुमारे २५ फुटाहून अधिक असल्याने वरून जाणाऱ्या विद्युतवाहक मेन लाईनला स्पर्श होऊन शिडीत विद्युत प्रवाह तयार झाला होता. या भागात सिग्नलवर पिशव्या विकणाऱ्या एका लहान मुलाचा स्पर्श या शिडीला झाल्याने मुलगा त्या लोखंडी शिडीला चिकटला गेला. ११ हजार व्होल्टच्या या विद्युत प्रवाहाच झटका इतका भयंकर होता की तो मुलगा त्यात जळून खाक झाला.

    या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन व एमएसइबीचे कर्मचारी हजर झाले. मुख्य म्हणजे ज्या सोसायटीच्या कामासाठी ही शिडी येथे आणण्यात आली होती त्यांनी काम करण्यापूर्वी कोणतीही परवानगी न घेतल्याचे व या प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएसइबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी तापसास सुरुवात केली आहे.