‘त्या’ ठेकेदाराने तोडलेला सिमेंट बंधारा तात्काळ बांधला

मुरबाड: रस्त्याच्या कामात बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा येतो म्हणून ठेकेदाराने सरकारी बंधाराच जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केला.याबाबत प्रहार संघटनेने ठाणे जिल्हा परिषदकडे तक्रार

 मुरबाड: रस्त्याच्या कामात बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा येतो म्हणून ठेकेदाराने सरकारी बंधाराच जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केला.याबाबत प्रहार संघटनेने ठाणे जिल्हा परिषदकडे तक्रार केल्यानंतर या बाबत सर्वप्रथम दै.नवराष्ट्रच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध झाली.ही बातमी प्रसारित झाल्यानंतर तात्काळ ठेकेदाराने हा बंधारा पूर्ववत बांधून दिला आहे.

मुरबाड तालुक्यात अँन्युटी हायब्रीड या कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत रस्त्याची कामे सुरू आहेत.यातील रस्त्यांपैकी म्हसा – धसई रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.या रस्त्यालगत गोरखगड येथे तूळई, देहरी, तळेखल, देशमुख पाडा, उचले येथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नैसर्गिक नाल्यावर जिल्हा परिषदच्या लघुपाटबंधारे विभागाकडून ९ लाख, ४९ हजार, ७२२ रुपये खर्चून सिमेंट के.टी.बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र या बंधाऱ्याच्या पाण्याचा रस्त्याचे काम करतांना अडथळा येतो म्हणून मुजोर ठेकेदाने हा बंधाराच जेसीबीने उखडला. या बाबतीत ठेकेदाराने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन,पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा लघुपाटबंधारे विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत प्रहारचे तालुका अध्यक्ष शरद पाटील यांनी तक्रार करून ठेकेदारावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.