मोहेली वरप दरम्यान उल्हासनदीवरील पूल बांधून तयार; पण ३ वर्षांनंतरही जोडकाम अपूर्ण असल्याने वाहतुकीची प्रतिक्षाच

दत्तात्रेय बाठे, कल्याण : मोहेली व वरप जोडणाऱ्या उल्हासनदीवरील मोहेली उदंचन केंद्रालगतचा पूल सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असून पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे तीन वर्षे झाल्यानंतरही वाहतुकीसाठी कधी खुला होणार असा सवाल येथील रहिवाशी करीत आहेत.

शहाड, आंबिवली, बल्याणी, टिटवाळा , मानवली नादंप, उभंर्णी, यासह पावशेपाडा अनखरपाडा, वाघेरापाडा, वरप या परिसरातील नागरिकांना या पुलामुळे आंबिवली, टिटवाळ्याचा भाग नगर मार्गाला वरप जवळ जोडणार असल्याने सुमारे दहा किलोमीटर अंतराचा वळसा घालून जावे लगणारे अंतर कमी होणार आहे. या पुलापासून सुमारे दीड किलोमीटर इतक्या अंतरावर वरप येथील नगर मार्गला जोडणार असल्याने इंधन बचतीसह, होणारी वाहतूक कोंडी दृष्टीकोनातून हा पुल सुरु होणे गरजेचे आहे.

उल्हासनदीवर मोहेली उदंचन केंद्राजवळ बांधण्यात आलेल्या या पुलाचे काम २०१५ साली सुरु करण्यात आले. सुमारे ५ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलाची लांबी १४० मीटर असून, रूंदी ८.२५ मीटर असुन ,उंची १० मीटर असून सब मार्शिबल हाय लेवल पुलाचा प्रकार असून या पुलाचा कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील मोहेली रस्त्याला भाग जोडला असून आनखरपाड्याकडील रिटर्न वाल रस्त्याच्या भाग व रस्ता बनविण्याचे काम बाकी आहे. तर पुलाचे काम केलेल्या ठेकेदाराला ९० टक्के बील अदा केले असून गतवर्षीच्या पुरामध्ये पुलाचे लोखंडी बरिगेटचे कठडे वाहून गेल्याने दुरावस्था झाली आहे. सब मार्शिबल हाय लेवल पुलाचा प्रकार असला तरी पुलावरून पुराचे पाणी गतवर्षी गेल्याने हा पूल सतत तीन चार दिवस अतिवृष्टी होत असल्यास पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकरता येत नसल्याचे स्थानिक कोळी बांधवाचे म्हणणे आहे. प्रशासनाने पूल बांधताना याकडे लक्ष देण्याची गरज होती असा सवाल यानिमित्ताने होत आहे.

प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे कामामुळे पावशेपाडा ते वरप हा पुलाला जोडणारा सद्य स्थितीत ३ मीटर रुंद इतका कच्च्या रस्ता असून रस्त्याच्या ७ मीटर रूंदीसह डांबरी करण प्रस्ताव प्रस्तावित असून पूल बांधून सुमारे तीन वर्षीहून अधिक काळ होऊनही पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागत नसल्याने शोकांतिका म्हणावी लागेल. याबाबत उपविभागीय अभियंता एम्.व्ही.चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता पावशेपाडा ते वरप हा पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे नाबार्ड च्या माध्यमातून दोन कोटी डांबरीकरण कामाचे प्राकलन मंजुरीसाठी प्रतिक्षेत असून साधरण नोव्हेंबर २०२१ मध्ये रस्त्यासह पुल वाहतुकीसाठी खुला होईल असे सांगितले.

“कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आंबिवली अटाळी, वडवली, शहाड, गाळेगाव, मोहने, मोहेली बल्याणी, उभर्णी, मानवली, नादंप टिटवाळा आदी भागातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीकोनातून फायदेशीर असणारा व वरप भागाकडे जाणारा शाँर्टकट मार्गच्या पुलाला जोडणाऱ्या पावशेपाडा ते वरप या रस्त्याबाबत पाठपुरावा करून पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरु होईल या प्रश्नाबाबत लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.”