बीएसएनएलच्या इंटरनेटचा बोजवारा ; पोस्ट व बँकेतील कामकाज ठप्प

कल्याण :मोहने परिसरातील बीएसएनएल ची इंटरनेट सेवाचा बोजवारा उडल्याने पोस्ट व बँक कार्यालयातील दैनंदिन कामकाज इंटरनेट अभावी ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात कार्यालयात कामाचा ढिगारा पडलेला दिसून येत

कल्याण :मोहने परिसरातील बीएसएनएल ची इंटरनेट सेवाचा बोजवारा उडल्याने  पोस्ट व बँक कार्यालयातील दैनंदिन कामकाज इंटरनेट अभावी ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात कार्यालयात कामाचा ढिगारा पडलेला दिसून येत आहे. 

मोहने येथील बीएसएनएल  कार्यालयाला टाळेच असल्याचे दिसून येत असून एकही कर्मचारी या कार्यालयात येत  नाही. गेल्या आठ दहा दिवसापासून  बँकेचे तसेच पोस्ट कार्यालयातील अधिकार्‍यांनी कल्याण येथील बीएसएनएलच्या व्यवस्थापकाला नियमित नेट सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार व दूरध्वनी करून विनंत्या केल्या आहेत. मात्र व्यवस्थापक बघतो , करतो अशी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे.

नेट अभावी या सरकारी कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी होत असून पैशाची देवाण-घेवाण तसेच नवीन खाते काढण्याच्या  संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंटरनेट हळुवार पणे चालत असल्याने पोस्ट कार्यालयात नवीन खाते उघडले जात नसल्याचे समोर येत असून यामुळे दररोज काउंटरवर असलेल्या कर्मचारी वर्गाची ग्राहकांचे भांडणे नित्याचेच होऊन बसले आहे.

एनआरसी कॉलनीत कार्यरत असणारी कॅनरा बँक इंटरनेट सेवा बरोबर भेटत नसल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून बँक कर्मचारी मोहने गावात असणाऱ्या शाखेत कर्मचारी वर्ग बसत  आहे. नेट अभावी संपूर्ण परिसरातील एटीएम सेवा घाशा गुंडाळून बसली आहे.बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा येथे पुरता बोजवारा उडाला असून कार्यालयीन कर्मचाऱ्यां बरोबर ग्राहक वर्ग मात्र कमालीचे संतप्त झाल्याचे दिसून येत आहेत. 

मोहने पोस्ट कार्यालयात ग्राहक व कर्मचाऱ्यांन मध्ये “तू तू-मै मै” पोस्ट कार्यालयात नेट अभावी ग्राहकांचे होत  कामे नसल्याने दररोज या ठिकाणी ग्राहक आणि कर्मचारी यांच्यामध्ये हमरीतुमरी होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ग्राहकांना बीएसएनएल इंटरनेट सेवेचा फटका बसत असल्याने आपले काम होईल या आशाने चक्कर पे चक्कर काढत यावे लागत असेल दुर्दैव म्हणावे लागेल अशी वेळ यानिमित्ताने ग्राहकांवर आली असल्याचे चित्र दिसत आहे.