Ed

टिटवाळा(titwala) येथील गुरवली(gurawli) परिसरात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(pratap sarnaik) यांची ७८ एकर जागा असल्याचा दावा करीत ही जागा ईडीकडून जप्त(ED at builders house) करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. प्रताप सरनाईक यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. प्रताप सरनाईक यांनी ही जागा योगशे देशमुख या बिल्डरकडून घेतली असल्याची बोलले जात आहे.

    कल्याण : टिटवाळा नजीकच्या गुरवली येथील जमिनीच्या व्यवहारा प्रकरणी(land dispute) ईडीची टीम कल्याण येथील एका मोठ्या बिल्डर(ed at kalyan) योगेश देशमुख यांच्या घरी पोहचली. ईडीची टीम घरी दाखल होताच योगेश देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    देशमुख कुटुंबियांचा आरोप आहे की, प्रताप सरनाईक सोबत जमिनीचा व्यवहार पूर्णत्वास आलेला नाही. तरी पण आम्हाला त्रास देऊन घाणेरडे राजकारण केले जात आहे.

    टिटवाळा येथील गुरुवली परिसरात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जागा असल्याचा दावा करीत ही जागा ईडीकडून जप्त करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. प्रताप सरनाईक यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. प्रताप सरनाईक यांनी ही जागा योगशे देशमुख या बिल्डरकडून घेतली असल्याची बोलले जात आहे.

    आज सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास आठ ते दहा आधिकाऱ्यांची एक टीम कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील विराजमान बंगल्यात दाखल झाली. हा बंगला योगेश देशमुख यांचा आहे. सुरुवातील ईडी अधिकाऱ्यासोबत देशमुख यांच्या पत्नीचा वाद झाला. याच दरम्यान योगेश देशमुख यांची तब्येत बिघडली. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या जमीन प्रकरणी घाणेरडे राजकारण सुरु आहे. त्यांना हवी तशी माहिती देण्यासाठी आपल्या वर टाकला जात असल्याचा आरोप देशमुख यांच्या पत्नीने केला आहे.