ठा.म.पा.च्या महासभेत चौथ्यांदा बुलेट ट्रेनचा मंजुरी प्रस्ताव पुन्हा लांबणीवर ?

अनेकवेळा लांबणीवर पडलेला बुलेट ट्रेन प्रश्न हे मुंबईच्या कारशेडला (Carshed) केंद्रातून होणारी चालढकलीचे फलित तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित मंगळवारी होणाऱ्या महासभेत शिवसेना (Shivsena) बुलेट ट्रेन संबंधी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. 

ठाणे : ठा.म.पा.च्या (T.M.C) काल शुक्रवारी झालेल्या महासभेत बुलेट ट्रेनचा (Bullet train approval ) प्रस्ताव चौथ्यांदा महासभेच्या पटलावर येणार होता. मात्र वेळच्या अभावे महासभा खंडित झाल्याने बुलेट ट्रेनचा विषय चौथ्यांदा (postponed again for 4th Time) बारगळला. आता हा प्रश्न मंगळवारी होणाऱ्या महासभेत चर्चिला जाणार आहे. अनेकवेळा लांबणीवर पडलेला बुलेट ट्रेन प्रश्न हे मुंबईच्या कारशेडला (Carshed) केंद्रातून होणारी चालढकलीचे फलित तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित मंगळवारी होणाऱ्या महासभेत शिवसेना (Shivsena) बुलेट ट्रेन संबंधी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेनला लागणाऱ्या जागा संपादनाच्या वेळी दिव्यात मनसेने आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र बुलेट ट्रेनसाठी मौजे शीळ येथील सर्व्हे क्र ६७/ब/५ हा भूखंड हवा आहे. सादर भूखंडाचे क्षेत्रफळ ३८४९.०० चौरस मीटर असून मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याखालील क्षेत्राचा मोबदला आकारून सदरची जागा ही नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन(बुलेट ट्रेन)साठी वापरात आणण्याची अनुमती देण्याचा विषय हा शुक्रवारच्या महासभेत पटलावर होता.

मात्र सत्ताधारी शिवसेना असलेल्या ठाणे पालिकेच्या गोषवाऱ्यात तो लाईनीत लावण्यात आला. अखेर वेळेच्या अभावी त्यावर चर्चाच झाली नाही. आता मंगळवारी होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीच्या वेळेस सभागृहात भाजप शिवसेना क्रमाने सामने येण्याची शक्यता वाढलेली आहे. बुलेट ट्रेनसाठी आवश्यक भूखंडाचे २०१८-१९ या वर्षाच्या रेडीनेकनरच्या दराने ठाणे पालिकेच्या मालकीचा भूखंडापैकी ०.३८.४९ हेक्टर हस्तांतरित करणे आहे.

त्याचा मोबदला किती द्यायचा याबाबत नॅशनल हाय स्पीडरेल कार्पोरेशन(बुलेट ट्रेन) यांनी ठाणे महापालिकेला पत्राने २३/१०/२०१९ रोजी कळविले आहे. २०१८-१९ च्या रेडीरेकनर दराने किंमत ९,००,००,००० एवढी प्रति हेक्टर आहे. याचाच निर्णय आणि ठाणे पालिकेच्या सभागृहाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. बुलेट ट्रेनचा प्रस्ताव हा चौथ्यांदा लांबणीवर पडलेला आहे.

जमिनीचा मोबदला निश्चित…

मंजुरीची प्रतीक्षा बुलेट ट्रेनसाठी मौजे शीळ सोबतच डावले, पडले, माथर्डी , देसाई, आगासन आणि बेटावडे या गावांमधील जमिनीचा मोबदला हा गावनिहाय दर निश्चित करण्यात आलेला आहे. तर महापालिकेच्या जागेचा मोबदला निश्चित करून त्या जागेच्या सातबाऱ्यावर नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन(बुलेटट्रेन) कंपनीचे नाव लावण्यासाठी ठाणे पालिकेच्या महासभेची मंजुरी आवश्यक आहे. मात्र महासभेत या विषावर चर्चाच झाली नसल्याने आता मंजुरी मंगळवार रोजी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो कारशेडला भाजपचा विरोध आणि केंद्रांची आडकाठी यामुळे ठाण्यातल्या बेलेट ट्रेनसाठी पालिकेची जागा नावावर करण्याच्या विषयावर विरोधाभास महासभेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पुन्हा हा मंजुरीचा प्रस्ताव लांबणीवर पडणार काय? शिवसेनेची भूमिका काय असणार? हे मंगळवारी महासभेत स्पष्ट होणार आहे.