Bull's Birthday Party in Dombivli; AJIT of Corona Rules at DJ Party

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. तर, दुसरीकडे लोकांमधील निष्काळजी आणि बेजबाबदारपणा काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. वाढदिवस, लग्न, हळदी समारंभांच्या पार्ट्यांनंतर आता डोंबिवलीमध्ये चक्क बैलाचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला.

    कल्याण : अती शहाणा त्याचा बैल रिकामा… अशी म्हण आहे. मात्र, डोंबिवलीतील एका बैल मालकाला याचा प्रत्यक्षात अनुभव आला आहे. डोंबिवलीमध्ये बैलाच्या वाढदिवसानिमित्ताने जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणी बैलाचे मालक किरण म्हात्रेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. तर, दुसरीकडे लोकांमधील निष्काळजी आणि बेजबाबदारपणा काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. वाढदिवस, लग्न, हळदी समारंभांच्या पार्ट्यांनंतर आता डोंबिवलीमध्ये चक्क बैलाचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला.

    बैलाचा वाढदिवस साजरा करत असताना फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली होती. DJ लावून आयोजकांनी स्टेजवर डान्स देखील केला.

    बैलाच्या बर्थ डे पार्टीवेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते. पोलिसांनी या बैलाचे मालक किरण म्हात्रेंवर गुन्हा दाखल केला आहे.