कल्याण ग्रामीणसह शहरी भागात पावसाची धुवाधांर Batting; सखल भागात पाणी साचले, वाहतूक कोंडीचा सामना

कल्याण तालुक्याला (Kalyan taluka) दोन दिवसापासून धुवाधांर कोसळणा-या पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील रुंदे पुल पाण्याखाली गेल्या ने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे, पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे.

  कल्याण (Kalyan).  कल्याण तालुक्याला (Kalyan taluka) दोन दिवसापासून धुवाधांर कोसळणा-या पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील रुंदे पुल पाण्याखाली गेल्या ने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे, पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असून कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ, वरप, कांबा येथे पाणी साचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.

  कल्याण तालुक्यात रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे, यामुळे टिटवाळा जवळील काळू नदीवरील रूंदे पुल आज सकाळी च पाण्याखाली गेला यामुळे परिसरातील१०/१५ गावांचा संपर्क तुटला. तसेच दहागाव बदलापूर रस्त्यावरील बारवी नदीचा पुल देखील लवकरचं पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्याची जीवनवाहिनी असलेली उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे मात्र पाऊस असाच पडत राहिला तर रायते पुल पाण्याखाली जाऊन कल्याण नगर रस्ता बंद होऊ शकतो.

  सतत पडणाऱ्या पावसामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ येथील थारवानी,रिजेन्शी,रोज वाईन ,टाटा पावर हाऊस,वरप येथील बजरंग हार्डवेअर येथे रस्त्यावर१०/१५ फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर रांग लागली होती.

  रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने तेही धोकादायक झाले होते, अनेक गावातील गटारे, नालेसफाई न झाल्याने भरभरुन वाहत होते,गावातील गल्ली, बोळाला नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.असे चित्र सर्वच ठिकाणी दिसत होते, या पावसामुळे डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरील डांबर कोठे वाहून गेले असा सवाल रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे उभा ठाकला आहे. गेली २४ तासात १७७एम् एम् इतकी पावसाची नोंद झाली असुन उल्हास ,काळु भातसा, वालधुनी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सोमवारी रात्री ९वा. २.५मीटर उंचीचे हायटाईड असल्याने भरतीच्या वेळेस पाऊस असा सुरू राहिला तर सखल भागाला मोठा फटाका बसण्याची शक्यता आहे.

  कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रात सखल भागातील सुमारे १००हुन कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थालतंर केले असुन खाद्य पाँकिटे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आदि वाटप करण्यात आले असुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. कल्याण तील शिवाजी चौक परिसर, महंमद अल्ली चौक परिसरात दुकानात पावसाचे पाणी दुकानात शिरल्याच्या घटना घडल्या. कल्याण – शीळ रस्त्यावर पाणी साचले, तसेच कल्याण – मुरबाड रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. गोळवली, रिजेन्सी ,मानपाडा, आदि परिसरात सखल भागात पाणी साचले होते. बेतुरकर पाडा, चक्की नाका, नांंदिवली, बल्याणी, टिटवाळा, प्रेम आँटो गणेश घाट आदि परिसरात सखल भागात पाणी साचले होते.

  “कल्याण नयाब तहसीलदार सुष्मा बागंर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पावसामुळे जिवित हानीची कुठलही घटना घडली नसुन खडवली भातसा नदी जवळील ज्यु गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले.”

  कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली शहरात मागील २४ तासात १७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे शहरात अतिवृष्टी होत असून या पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण डोंबिवली शहर खाडीकिनारी असल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.

  खाडीकिनारी भागातील नागरिकांचे शाळांमध्ये कालपासून स्थलांतरन केले जात असून ज्याभागात पाणी साचत आहे त्या भागातील नागरिकांनी वेळेवर स्थलांतरित होऊन स्वतःचा जीव वाचवावा असे आवाहन करण्यात आले असुन शहरात सचणाऱ्या पाण्यावर पालिकेच्या कंट्रोल रुम मधून ७०० कॅमेर्याद्वारे लक्ष ठेवले जात असून पालिकेची संपूर्ण यंत्रणा पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी सतर्क आहे. पाणी वाहून नेणारी गटारे साफ करण्याबरोबरच पाण्याचा निचरा करण्यासाठी पूर नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.