गॅस लिकेजने लागलेल्या आगीत हॉटेल जाळून खाक 

ज्योती हॉटेल (Jyoti Hotel) असे नाव असलेल्या हॉटेल मध्ये सकाळी नऊ वाजता हॉटेल चालक सिलेंडर बदली करीत असताना सिलेंडर लिकेज (Gas Leak) असल्याने त्याने अचानक पेट घेतला व हॉटेल व त्यामधील लाकडी पोट माळा व फर्निचर असे सर्व साहित्य जाळून खाक झाले

 भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये (Hotel) गॅस  सिलेंडर (Gas Cilender) बादलीत असताना अचानक पेट घेतल्याने संपूर्ण हॉटेल जाळून खाक झाले आहे.

ज्योती हॉटेल (Jyoti Hotel) असे नाव असलेल्या हॉटेल मध्ये सकाळी नऊ वाजता हॉटेल चालक सिलेंडर बदली करीत असताना सिलेंडर लिकेज (Gas Leak) असल्याने त्याने अचानक पेट घेतला व हॉटेल व त्यामधील लाकडी पोट माळा व फर्निचर असे सर्व साहित्य जाळून खाक झाले. स्थानिकांनी प्रसंगावधान राखीत गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी जीवित व वित्तहानी टळली असून भिवंडी अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे .