तर अमिताभ व अक्षय यांना रिपब्लिकन पक्ष सुरक्षा पुरवेल- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रामध्ये शुटिंग करू देणार नाही, अशी धमकी दिली होती. नाना पटोले यांच्या या भूमिकेला रामदास आठवलेंनी विरोध दर्शवला आहे.

  • नवी मुंबईत रिपाइंचा मी रिपब्लिकन मेळावा यशस्वी

नवी मुंबई : महाराष्ट्रात गुंडाराज नाही. त्यामुळे तुम्ही असे विधान करु शकत नाही. जर तुम्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाचे शुटिंग बंद करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. याबाबत लवकरच बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मी रिपब्लिकन या नावाने कार्यकर्ता मेळावा पार पडला त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रामध्ये शुटिंग करू देणार नाही, अशी धमकी दिली होती. नाना पटोले यांच्या या भूमिकेला रामदास आठवलेंनी विरोध दर्शवला आहे. जर तुम्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाचे शुटींग बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तर रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी पुरावतील असेही ते म्हणाले.

मुंबईसह अनेक महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली आहे. भजपासोबत निवडणुकीत एकत्र लढवण्याचे ठरवले आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला २५ जागा मिळाल्या पाहिजेत. तशी यादी आम्ही आ. गणेश नाईकांकडे पाठवली आहे. तसेच त्यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे.

शेवटी आम्हाला ६ ते ७ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे असे ते म्हणाले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, असेही आठवलेंनी यावेळी जाहीर केले. तसेच शेतकरी आंदोलन करत आहेत मात्र ते चुकीचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहोत. विरोधक उगाचच अदानी व अंबानी यांचे नाव घेत दिशाभूल करत आहेत त्यांना शेती सोडून अनेक व्यवसाय आहेत. त्यांना मोठे करण्यासठी केला जाणारा आरोप तथ्यहीन असल्याचे आठवले म्हणाले.

याउलट केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांमुळे कोणताही शेतकरी कुठेही आपला माल विकू शकतो. यामागे एपीएमसी बंद करण्याचा कोणताही हेतू नाही. शेतकरी नेते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे आठवले म्हणाले. पेट्रोल डिझेल व गॅसचे भाव वाढण्यास केंद्र सरकारचा दोष नसल्याचे आठवले म्हणाले. मनमोहन सिंग सरकार असताना एक वर्षात १० वेळा भाववाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही भाववाढ कमी करण्यासठी प्रयत्न करत आहोत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे की, याबाबत केंद्र व राज्य सरकारने काही टॅक्स कमी कारावेत म्हणजे भाववाढ रोखता येईल.