कॅन्सरग्रस्त रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू, मुरबाड तालुक्यात ४४ कोरोनाग्रस्त

मुरबाड: आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या मुरबाड तालुक्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत असून सध्या रुग्णसंख्या ४४ इतकी झाली असून मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील आणखी एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा

 मुरबाड: आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या मुरबाड तालुक्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत असून सध्या रुग्णसंख्या ४४ इतकी झाली असून मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील आणखी एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुरबाडमधून कामानिमित्ताने कोरोनाबाधित क्षेत्रात ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. क्वारंटाईन न होणाऱ्या या व्यक्तींमुळे तालुक्यात या आजाराचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.सध्या तालुक्यात ४४ रुग्ण आहेत.यातील ३३ रुग्णांवर उपचार सुरू असून आठ रुग्ण हे बरे झाले आहेत, तर दोन कॅन्सरग्रस्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोनारपाडा येथील ५८ वर्षीय व्यक्ती कॅन्सरवर उपचार करून घरी परतली होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
सध्या तालुक्यात १२९ जण होम क्वारंटाईन आहेत. तसेच ५८ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे मुरबाडकरांनी अधिक काळजी घेण्याची आणि सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.