डोंबिवलीतील कोविड सेंटरच्या आवारात रंगली गांजा आणि दारूपार्टी; सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटर मधील प्रकार

याबाबत महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी पाटील यांनी सांगितले की, सावळाराम कोविड सेंटर पालिका प्रशासनाकडून उभारण्यात आले आहे. मात्र हे रुग्णालय डॉक्टरांच्या एका खाजगी संस्थेकडून चालवले जाते. या आऊट सोर्सिंग संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीच रुग्णालयाच्या आवारात दारू पार्टी केल्याची खेदजनक घटना घडली असून ही घटना समोर येताच संबंधित ठेकेदाराने पार्टी करणाऱ्या तिन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

    डोंबिवली : मागील महिन्यात कल्याणतील कोविड सेंटर मध्ये एका वॉर्ड बॉय ने महिलेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा डोंबिवली मधील सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचार्यची रुग्णालयाच्या आवारातच  दारू पार्टी  केली त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला  आहे . दरम्यान हा व्हिडिओ कढणाऱ्या तरुणाला देखील या मद्यपिंनी मारहाण केल्याची घटना घडली.  या घटनेनंतर  पुन्हा एकदा कोरोनाग्रस्त रुग्णाच्या रुग्णालयातील  सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    याबाबत महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी पाटील यांनी सांगितले की, सावळाराम कोविड सेंटर पालिका प्रशासनाकडून उभारण्यात आले आहे. मात्र हे रुग्णालय डॉक्टरांच्या एका खाजगी संस्थेकडून चालवले जाते. या आऊट सोर्सिंग संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीच रुग्णालयाच्या आवारात दारू पार्टी केल्याची खेदजनक घटना घडली असून ही घटना समोर येताच संबंधित ठेकेदाराने पार्टी करणाऱ्या तिन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याचे सांगितले.