कल्याण पूर्वेत शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधून केला शिक्षक दिन साजरा

सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षिका ललिता मोरे, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया गायकर, आयडियल शाळेचे क्रीडाशिक्षक सुधाकर ठोके, एटम कॅम्पुटरचे संचालक अनिल एटम यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश ओंबासे यांनी तर तांत्रिक बाजू लीपिका पाल यांनी सांभाळली.

कल्याण : स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्यांच्या विध्यार्थ्यांनी साजरा करायचा ठरवले होते पण राधाकृष्णन म्हणाले की सर्व शिक्षकांचा ही सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून तेव्हापासून म्हणजे १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर त्या निमित्ताने असा साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.

कल्याण पूर्व शिक्षक संघाच्या वतीने सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन संवादाचे आयोजन केले होते. यामध्ये कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी सहभाग घेऊन सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांचे प्रश्‍न आणि समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे शिक्षकांना उद्देशून सांगितले. कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे यांनीही शिक्षकांशी संवाद साधून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.