Central team arrives in Thane district; He will stay in the district for 15 days

केंदीय आरोग्य पथक ठाणे जिल्हयात 15 दिवस थांबणार असल्याने जिल्यातील असलेल्या 6 महापलिकेचा आढावा घेणार आहे. तसेच ठाणे जिल्यातील ग्रामीण भागात देखील सर्व्ह होणार असून शहरातील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. कोरोना साथीचा आजारावर अश्या पध्दतीने काम सुरू आहे ? कुठे काही कमी पडते आहे का ? तसेच येथील नागरिक नियमाचे पालन करणार आहे का ? याचा देखील आढावा केंदीय पथक घेणार आहे.

    ठाणे : जिल्यात कोरोनाने उच्छाद मांडलेला असताना वाढत्या कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंदीय पथकांच्या डॉक्टरांची टीम ठाण्यात दाखल झाली आहे. गुरुवारी दाखल झालेल्या डॉक्टरांच्या या टीमने शहरात पाहणी केली असून तब्बल 15 दिवस ही टीम ठाण मांडणार आहे.

    एकीकडे कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता कोरोना वाढीची कारणे विविध शहरात अनेक आहेत यावर कश्या पध्दतीने उपाययोजना करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडे यंत्र सामुग्री आहे का ? तसेच शहरातील रुग्णांच्या वाढीव संदर्भात आढावा केंदीय पथक घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    कोरोना साथीच्या आजारावर केंद्रीय आरोग्य पथकाने ठाण्यातील मायक्रो कॅटेन्मेंट झोन येथे पाहणी केली. माजीवडा भागात सर्वात जास्त रुग्ण आढळून येत असल्याने या परिसरातील नीलकंठ व्हॅली आणि लोढा येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ठाणे महापलिकेचे आरोग्य अधिकारी, प्रभाग समितीचे आधिकरी यांच्या उपस्थितीत या सर्व भागाची पाहणी या केंदीय पथकाने केली असून पुढील 2 दिवस 5 डॉक्टरांची टीम काम करणार आहेत.

    तसेच ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेले टेस्टिंग सेंटर ला भेट देऊन टेस्टिंग कश्या पध्दतीने सुरू आहे. रोझा गार्डनिया येथे सुरू असलेल्या लसीकरण कश्या पध्दतीने सुरू आहे हे देखील या पथकाने जाणून घेतले. दरम्यान यामध्ये काही त्रुटी जाणवल्या असून तश्या पध्दतीच्या सूचना देखील या केंदीय पथकाने पालिका प्रशासनाला केल्या आहेत. पुढील काही दिवसांत ठाण्यातील झोपडपट्टी भागात देखील हे पथक जाणार असून तेथील परिस्थितीचा आढावा देखील हे पथक घेणार आहे.

    करोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वंकष प्रयत्न होत असताना नागरिकांकडून नियमाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मास्क हे करोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे. दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात अशी सूचना देखील यावेळी करण्यात आली. गुरुवारी या पथकाने संपूर्ण ठाणे शहराचा आढावा घेतला त्यांनतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन वरिष्ठ डॉक्टरांशी शहराच्या परिस्थितीत बाबत चर्चा केली. प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी टीमवर्क ठेवावे, असे निर्देश पथकाने दिले असून जिल्यातील विविध महापालिका मध्ये जाऊन हे पथक आढावा घेणार आहे.