Chemical gas leaks in MIDC premises; Residents have vomiting, coughing and difficulty breathing

MIDC परीसरात केमिकल वायू गळती झाल्याने बदलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. या वायू गळतीमुळे स्थानिकांना उलट्या, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    बदलापूर : MIDC परीसरात केमिकल वायू गळती झाल्याने बदलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. या वायू गळतीमुळे स्थानिकांना उलट्या, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    शिरगांव, आपटेवाडी परिसरातील नागरिकांना याचा सर्वात जास्त त्रास होतोय. केमिकल प्लांट MIDC मध्ये वायू गळती झाली आहे. यामुळे अनेकांना सतत खोकला येत आहे. काहींना उलट्या होत आहेत. तसेच श्वास घेतानाही त्रास होत आहे. या प्रकारामुळे नागरीक भयभित झाले आहेत.

    MIDC प्रशासानाने तात्काळ याची दखल घेत सदर कंपनी मध्ये जाऊन वायू गळतीचे कॉक तात्काळ बंद केले. मिळालेल्या माहिती नुसार वायू गळती जास्त विषारी नसल्याचे समजते. सुमारे नऊच्या सुमारास नागरीकांना वायू गळतीमुळे त्रास जाणवला. यानंतर साडे दहाच्या सुमारास सर्व सुरळीत झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.